जळगाव मिरर । १८ फेब्रुवारी २०२६
कर्जबाजारीपणामुळे तणावात असलेले शेतकरी हिरामण झिपरू धोबी (दहीभाते) (६२, रा. : वडली, ता. जळगाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १६ फेब्रुवारी रोजी वडली शिवारातील शेतात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, हिरामण धोबी यांचे वडली शिवारात शेत असून त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलेले होते. कर्जाचा बोझा वाढल्याने ते तणावात होते. या तणावातून त्यांनी शेतात जाऊन गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच त्यांचे पुतणे विकास दहीभाते यांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.




















