
जळगाव मिरर । 22 ऑक्टोबर 2022
दिवाळीचा सण सर्वत्र साजरा होत असतांनाच जळगाव तालुक्यातील महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याचे अडीच ते तीन लाखांचा कापूस जळून खाक झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील फुपनगरी येथील रविंद्र माणिक चौधरी यांच्या राहत्या घरासमोरील गोठ्यात त्यांना शेतातून काढून आणलेला कापूस ठेवलेला होता. या गोठ्यावर इलेक्ट्रीकच्या तार गेलेल्या असून त्या खाली लोबकळत असल्याने विद्युत प्रवाह कमी जास्त वेगात झाल्याने या गोठ्यातील कापूस जळून खाक झाला आहे. ही घटना दि.22 रोजी दुपारी 12 ते 1 वाजेदरम्यान घडली आहे. खांब सरळ करण्यासाठी व जागा बदलविण्यासाठी त्यांनी गेल्या काही महिन्यापासून एमएसईबीला तक्रारही केली होती. परंतु एमएसईबीच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी ही तक्रारीची दखल न घेतल्याने ऐन दिवाळीत तोंडाजवळ आलेला शेतकऱ्याचा घास हिरावून गेला आहे. या घटनेत शेतकऱ्यांची 25 ते 30 क्विटंल साधारण 2 लाख ते ३ लाखाचे नुकसानपर्यंत कपाशी असल्याचा दावा शेतकरी चौधरी यांनी केला आहे. एक महिन्यापासून एमएसईबीला ग्रामपंचांयतीने अर्ज देखील केलेला होता, परंतु याची देखील दखल घेतली नसल्याने ही वेळ शेतकरीवर आज दिवाळीच्या दिवसात येवून ठेपली आहे. ही घटना घडल्यानंतर एमएसईबीचे नारखेडे हे घटनास्थळी पूर्ण कापूस जळाल्यानंतर 3 वाजेदरम्यान दाखल झाले होते.




















