जळगाव मिरर | १३ जानेवारी २०२४
राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडत असतांना एक भीषण अपघाताची बातमी बीड जिल्ह्यातून समोर आली आहे. बीडच्या मांजरसुंबा – पाटोदा महामार्गावर कंटेनर व पिकअपचा भीषण अपघात झाल असून या अपघातात ५ जण जागीच ठार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन घरत, प्रल्हाद घरत, विनोद सानप असे पीकअप मधील मयतांची नावे आहेत. कंटेनरमधील चालकासह अन्य 1 जण ठार झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता, की अपघातानंतर कंटेनरमधील लोखंडी पाईप रस्त्यावर पसरल्याने वाहतुकी खोळंबली होती.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढत जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघाताच्या घटनेने महाजनवाडीसह वाघीरा गावावर शोककळा पसरली आहे.