• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आठ वर्षाच्या मुलासमोर वडिलांनी केली आईची हत्या !

पुणे शहरातील नांदेड सीटीजवळ घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 6, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
आठ वर्षाच्या मुलासमोर वडिलांनी केली आईची हत्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ मे २०२५

राज्यातील पुणे शहर गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीच्या घटनामुळे चर्चेत येत असतांना आता एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. आठ वर्षांच्या मुलासमोरच आपल्या पत्नीचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जाताना पोलिसांनी आरोपीला पकडले. ही हत्या घरगुती वादातून झाल्याचे समोर आले आहे. ही घटना नांदेड सीटीजवळ घडली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, स्वयंपाक करण्यावरून व घरात पैसे न दिल्याच्या कारणावरून पती व पत्नीमध्ये वाद झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपी पतीने आपल्या 8 वर्षांच्या मुलासमोरच पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पत्नीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीवरून घेऊन निघाला. यावेळी रस्त्यातच पोलिसांनी त्याला पकडले. यावेळी चौकशीत आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना त्याच्या बोलण्यावर संशय आला व कसून चौकशी सुरू केली. यावेळी पोलिसांनी 8 वर्षांच्या मुलाला विचारले असता, मुलाने घडलेला संपूर्ण प्रकार डोळ्यात पाणी आणत सांगितला आणि आरोपी पतीचे पितळ उघडे पडले.

राकेश निसार असे आरोपीचे नाव आहे तर बाबीता निसार असे मृत महिलेचे नाव आहे. आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी राकेश निसारला रंगेहाथ पकडले आणि सिंहगड पोलिसांनी अटक केली. राकेश हा धायरी परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होता व मजूरी काम करायचा. रात्री एकच्या सुमारास स्वामीनारायण मंदिरासमोरून भुमकर पुलाजवळ राकेश आपल्या पत्नीचा मृतदेह घेऊन जात असताना काही लोकांनी पाहिले. येथील नागरिकांना संशय आला व त्यांनी तातडीने पोलिसांना याची कल्पना दिली. यावेळी भुमकर पुलाजवळ बिट मार्शल पोहोचले आणि राकेशला पकडले. यावेळी राकेशने दुचाकी सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मृतदेह कोणाचा आहे आणि कुठे घेऊन चालला असा प्रश्न विचारल्यावर राकेशने उडवाउडवीचे उत्तर देण्यास सुरू केले. मित्राने मृतदेह मागवला होता. त्याला खेडशिवपूरजवळ नेऊन देतो असे त्याने सांगितले. तसेच मृत पत्नीने फाशी घेत आत्महत्या केल्याचेही त्याने सांगितले. पोलिसांना संशय आला व त्यांनी थेट राकेशचे घर गाठले. यावेळी घरात राकेश आणि बाबीताचा आठ वर्षांचा मुलगा होता. मुलाकडे चौकशी केली असता मुलाने पोलिसांना सांगून टाकले की वडिलांनीच आईला मारून टाकले. आई आणि वडिलांमध्ये जेवणावरून आणि पैसे देण्याच्या कारणावरून रोज वाद व्हायचे. आज भांडण झाल्यावर बाबांनीच आईला गळा दाबून मारून टाकले, असे उत्तर मुलाने पोलिसांना दिले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम सांगताना पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल म्हणाले की, ‘काल नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. लायगुडे मळा परिसरातील समृध्दी सोसायटीत हे जोडपं गेल्या दीड वर्षांपासून राहत होतं. आरोपी राकेशने राहत्या घरात बबीताची हत्या केली. दोघेही मूळचे उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. दीड वर्षापासून ते पुण्यामध्ये राहायला आलेले होते. घटना घडली त्या दिवशी दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला होता. सोमवारी रात्री आरोपी राकेशच्या वडिलांचा फोन आला होता. त्यांनी फोनवरून मुलगा राकेशकडे पैसे मागितले, मात्र, पत्नी बबीताने राकेशच्या वडिलांना पैसे देण्यासाठी नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. या नवरा-बायकोच्या वादानंतर बबिताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा प्रयत्न फसला. मात्र, यानंतर संतापलेल्या राकेशनं बबीताची हत्या केली.

Related Posts

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

शतपावली ठरली महागात : ७२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली !

October 2, 2026
जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

शतपावली ठरली महागात : ७२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group