मेष : नाेकरी-धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. नोकरदारांनी इतरांच्या भानगडीत न डोकावता फक्त बिनचूक काम करण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे.
वृषभ : उद्योग -व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस तितकासा अनुकूल नसल्याने नवे उपक्रम उद्यावर ढकला. पती-पत्नींमधील वादावर आज मौन हा रामबाण उपाय राहील.
मिथुन : कार्यक्षेत्रात वावरताना आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील. तुमच्यातील नेतृत्व गुणांस वाव मिळेल. पत्नीच योग्य सल्ले देईल.
कर्क : ध्येयप्राप्तीसाठी कामाचे तास वाढवावे लागतील. काही येणी असतील तर मागायला लाजू नका. गृहिणींसाठी अति व्यग्र दिवस. आरोग्याच्या तक्रारींची दखल घ्या.
सिंह : नाेकरदार वरिष्ठांचे मूड सांभाळतील. कलाकारांच्या उमेदवारीस यश येऊन त्यांना उत्तम संधी चालून येतील.रुग्णांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येईल.
कन्या : आनंदी व उत्साही दिवस असून सगळी कामे सुरळीत पार पडतील. गृहिणींना गृहोद्योगातून चांगली मिळकत होईल. कलेच्या क्षेत्रातील नवोदितांना स्ट्रगल वाढवावी लागेल.
तूळ : सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. विद्यार्थ्यांना आज अभ्यास कंटाळवाणा वाटेल.
वृश्चिक : आज तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. वाणीत गोडवा ठेवून अनेक किचकट प्रश्न मार्गी लावाल.
धनु : महत्त्वाच्या चर्चेत आपल्याच मतावर अडून राहाल. अति आत्मविश्वास आज नुकसानास कारणीभूत ठरू शकेल. इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा. सुसंवाद साधा.
मकर : नवीन व्यवसायात आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेली पुंजी जपून वापरावी. सत्संगातून मन:शांती.
कुंभ : कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. इतरांस न झेपणाऱ्या स्वीकाराल व त्या पूर्णही कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज थोडी अहंकाराची बाधा होईल.
मीन : नोकरीच्या ठिकाणी आज अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांचे उत्तम सहकार्य मिळणार आहे. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळून कायद्याच्या चौकटीतच राहा.
