जळगाव मिरर | २७ मार्च २०२४
गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीच्या उमेदावरांची घोषणा झाली नसताना अखेर आज ठाकरे गटाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने 17 उमदेवार जाहीर केले असून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. यात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांना तर नाशिकमधून राजाभाऊ वाजे यांना संधी देण्यात आली आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत आहे. मुंबईत उद्धव ठाकरे गटाची ताकद जास्त आहे. त्यामुळे मुंबईत जास्त जागा उद्धव ठाकरे गटाला मिळाल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाला मुंबईत एकच जागा मिळण्याची शक्यता आहे. ती म्हणजे दक्षिण मध्य मुंबईची. इथले विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत. उर्वरित पाच जागांवर भाजपा आपले उमेदवार उतरवू शकतो. भाजपाने मुंबईतील काही जागांवर आपले उमेदवार सुद्धा जाहीर केले आहेत.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. मुंबई दक्षिण मध्य: अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे..
*मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.
इतर 16 उमेदवार… pic.twitter.com/nPg2RHimSF— Sanjay Raut (@rautsanjay61) March 27, 2024
ठाकरे गटाकडून कोणाला संधी ?
1 बुलढाणा उमेदवार – प्रा. नरेंद्र खेडेकर
2 यवतमाळ – वाशिम – संजय देशमुख
3 मावळ — संजोग वाघेरे पाटील
4 सांगली – चंद्रहार पाटील
5हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
6 संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
7 धारशीव – ओमराजे निंबाळकर
8 शिर्डी – भाऊसाहेब वाघचौरे
9 नाशिक – राजाभाऊ वाजे
10 रायगड – अनंत गीते
11 सिंधुदुर्ग – रत्नागिरी – विनायक राऊत
12 ठाणे – राजन विचारे
13 मुंबई – ईशान्य – संजय दिना पाटील
14 मुंबई – दक्षिण – अरविंद सावंत
15 मुंबई – वायव्य- अमोल कीर्तिकर
16 परभणी – संजय जाधव
17 अनिल देसाई – मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघ
