जळगाव मिरर | २ जानेवारी २०२५
घरात काम करणाऱ्या मोलकरणीने सोन्या बिस्कीटांसह २० लाख रुपयांची रोकड चोरुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी संशयित छाया संग्राम विसपुते या मोलकरणीला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीत असतांना मोलकरणीकडून पाच लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच सोन्याचे बिस्कीटाचा शोध घेण्यासाठी मोलकरणीला दि. ३ जानेवारीपर्यंत दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील विवेकानंदनगरात डॉ. प्रकाश चित्ते यांचे हॉस्पिटल असून ते तेथेच आपल्या कुटुंबीयांसह राहतात. त्यांच्या दुसऱ्या मजल्यावरील राहत्या घरात छायाबाई संग्राम विसपुते ही मोलरणीन असून तीने मे ते डिसेंबर अखेरच्या काळा पर्यंत वेळोवेळी घरातून २० लाख रुपयांची रोकड आणि चार लाख रुपयांचे सोन्याचे बिस्किट चोरुन नेले होते. याप्रकरणी डॉ. चित्ते यांनी जिल्हापेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन संशयित मोलकरीन छाया विसपुते हीच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी शनिवारी महिलेला ताब्यात घेवून तीची चौकशी केली. यावेळी त्या महिलेने चोरी के ल्याची कबुली दिल्यानंतर रविवारी सायंकाळच्या सुमारास संशयित छायाबाई विसपुते हीला अटक करण्यात आली होती. बुधवारी मोलकरणीची वाढीव पोलीस कोठडी संपल्यानंतर तीला न्यायाधीश एम. एम. बढे यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने तीला दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. अविनाश पाटील हे कामकाज पाहत आहे.
अटक केलेल्या छाया ज्ञानेश्वर मराठे उर्फ छायाबाई संग्राम विसपुते या मोलकरीणीची पोलीस कोठडीत चौकशी करण्यात आली. पोलिस चौकशीत छाया मराठे उर्फ छायाबाई विसपुते हीने चोरलेल्या पैशातील पाच लाखांची रोकड पोलिसांनी हसतगत केली. तसेच मोलकरणीने डॉक्टरांच्या घरातून चोरलेले बिस्कीट हस्तगत करणे बाकी आहे. तसेच रोकड व सोन्यासह या मोलकरणीने अजून कोणत्या किमती वस्तू चोरलेल्या आहेत का?, चोरलेल्या पैशांची विल्हेवाट कशी लावली, तिच्या सोबत अन्य कोणी सहकारी आहे का याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.