जळगाव मिरर | १० एप्रिल २०२४
अहमदनगर जिल्ह्यातील भेंडा येथे मांजराला वाचविण्यासाठी पाच जणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी वाकडी (ता. नेवासा) येथे घडली. विहिरीत गोमूत्र, शेण, डाळीचे पीठ टाकलेले असल्याने त्यात बायोगॅस तयार झालेला होता. त्यामुळेच ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतातील घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत एक मांजर पडले. त्याला काढण्यासाठी एकजण विहिरीत उतरला. त्यांना विहिरीतून बाहेर येता येईना. म्हणून दुसरा उतरला. त्यानंतर इतर तिघेही विहिरीत उतरले होते. माणिक काळे (६५), संदीप काळे (३६), अनिल काळे (५८), विशाल काळे (२३), बाबासाहेब पवार (३५) अशी मृतांची नावे आहेत, तर विजय काळे (३५) याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मृत एकाच कुटुंबातील मृतांपैकी माणिकराव काळे, त्यांचा मुलगा संदीप, पुतण्या अनिल आणि पुतण्याचा मुलगा विशाल असे चौघे हे एकाच कुटुंबातील आहेत. माणिकराव यांचा दुसरा मुलगा विजय याला उपचारासाठी दाखल करण्यात आले.