
लोहारा ता. पाचोरा : प्रतिनिधी
देशाच्या अमृत महोस्तवानिमित्त देशासह राज्यात १५ ऑगस्टनिमित्त प्रत्येक शासकीय कार्यालयात ध्वजरोहण होत आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी सामाजिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येत आहे मोठ्या उत्साहात हे कार्यक्रम संपन्न होत असून लोहारा येथील विकास सोसायटीमध्येही ध्वजरोहण कार्यक्रम उत्साहात झाला.
यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन शरद सोनार यांच्या हस्ते ध्वजरोहन करण्यात आले. कैलास चौधरी, रमेश लिंगायत, अतुल कोळी, राजू लिंगायत, शाम टेलर, प्रभाकर पालीवाल, दत्तू परिवार, मनोज अंबिकार, सिताराम काकडे, दिलीप गुजर गावातील शेतकरी बांधव व चंद्रकांत पाटील दीपक पवार कार्यकर्ते उपस्थित होते.




















