जळगाव मिरर | २८ ऑक्टोबर २०२३
मध्य रेल्वेच्या टिटवाळा-कसारा स्थानकादरम्यान शनिवार व रविवार रोजी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी काही उपनगरीय गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वे गाड्या उशिराने धावणार आहेत.
अप मेल अथवा एक्स्प्रेस गाड्या क्र. १२१०६ गोंदिया – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विदर्भ एक्स्प्रेस ही गाडी २८ रोजी गोंदिया येथून ३ तास उशिराने सुटेल. डाऊन मार्गावरील गाड्या क्र. १२१४१ लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्स्प्रेस ही, गाडी २८ रोजी ४ वाजता तर क्र. ११०५७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- अमृतसर एक्स्प्रेस ही गाडी २८ रोजी ४:१० वाजता सुटेल. क्र. १२८११ लोकमान्य टिळक टर्मिनस- हटिया एक्स्प्रेस ही गाडी २९ रोजी ४:३० वाजता, क्र. २२१७७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वाराणसी महानगरी एक्स्प्रेस ही गाडी २९ रोजी ४:२० वाजता आणि क्र. २२५३८ लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस ही गाडी २९ रोजी ०४:४५ वाजता सुटणार आहे. या ब्लॉक दरम्यान काही गाड्या भुसावळ विभागात थांबविण्यात येणार आहेत. याशिवाय रविवार, २९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कल्याण विभागादरम्यान मेन मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.