अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर नगरपालिकेमार्फत नळपट्टी वसली करीता देण्यात देणाऱ्या नळपट्टीबील मधील रकमेस २ टक्के ची भिकारी वाढ लावण्याचा निर्णय अमळनेर नगरपरिषदेने घेत सामान्य नागरिकांना षडयंत्रने लुटले जात आहे. कायद्याचा धाक दाखवत सदर व्याज वसूलीचे धोरण म्हणजे अमळनेर करांची आपण एक प्रकारे लूट करीत आहात अशी भावना जनमानसाची झाली आहे.
त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांचा मालमत्ता धारकांना लोकवर्गणीच्या नावाखाली वारंवार वसुलीचा घाट घातला जात आहे. (बांधकाम परवानगीच्या वेळेस लोकवर्गणी, नळ कनेक्शन घेतांना लोकवर्गणी, मालमत्ता वार्षीक कर मध्ये लोकवर्गणी) म्हणजे एकच व्यक्तीकडून किती वेळेस लोकवर्गणी घ्यावी याला देखील मर्यादा आहेत की नाही? त्याचप्रमाणे खुल्या भुखंडाना देखील कर नगरपरिषदेने निश्चीत केला आहे. आपण अमळनेरकर नागरिकांना सुख सोयी देण्यापेक्षा अव्वाचा सब्वा छुप्याकरांचा माध्यमातुन एक प्रकार लूटच करीत आहात वरील सुलेमानी निर्णय / सावकारी वसुली निर्णय तात्काळ नागरीहितास्तव मागे न घतल्यास जन आंदोलनाची भुमिका आम्हांस स्विकारावी लागेल.असे. अशयाचे विनंतीचे निवेदन आज माजी आ.शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडी मार्फेत मुख्याधिकारी अमळनेर नगर परिषद यांना दिले. या निवेदनावर गटनेते प्रवीण पाठक, योगराज संदानशीव, पंकज चौधरी, नाविद शेख, अनिल महाजन, गुलाब नबी पठाण, जाकीर पठाण, सुनिल भामरे, प्रवीण पाटील, पांडुरंग नाना इ. च्या सह्या होत्या.
