
जळगाव मिरर | २८ ऑक्टोबर २०२३
राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहे तर अनेक भागात राजकीय नेत्यांना गावबंदी देखील केली आहे. मराठा आरक्षणावरून आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता बीडच्या मादळमोही गावात ठाकरे गटाचे माजी मंत्री बदामराव पंडित यांची चारचाकी फोडल्याची घटना घडली आहे.
मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. मराठा आरक्षणावरून राज्यातील बहुतांश गावात घेरलं जात आहेत. मराठा आंदोलकांनी काही दिवसांपूर्वी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केली होती. या तोडफोडीच्या घटनेनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांवर सडकून टीका केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाचे माजी मंत्री बदामराव पंडित यांची कार मराठा आंदोलकांनी फोडल्याची घटना घडली आहे.
बीडच्या मादळमोही गावात बदामराव पंडित आले होते . त्यावेळी मराठा आंदोलकांनी गाडीवर दगडफेक करत गाडी फोडली. मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलकांच्या टार्गेटवर राजकीय नेते आणि मराठा पुढारी असल्याचं दिसून येत आहे.