
जळगाव मिरर | ९ एप्रिल २०२६
भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेच्या दिवशी जिल्ह्यातील राजकीय वातावरणात मोठा बदल घडला आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विनोद बडगुजर आणि माजी मनसे पदाधिकारी अँड सागर शिंपी यांनी दिनांक ६ एप्रिल रोजी भाजप कार्यालय जी एम फाउंडेशन येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
पक्षात प्रवेशाच्या सोहळ्यात भाजपा जिल्हा महानगर अध्यक्ष सुरेश भोळे (राजू मामा), दीपक सूर्यवंशी तसेच भाजपचे पदाधिकारी उदय भालेराव, सदाशिव आबा, सुनील बढे, मनोज भांडारकर आणि मनोज सोनवणे उपस्थित होते. या प्रसंगी नवीन सदस्यांना पक्षाचा पारंपरिक गमछा प्रदान करून औपचारिक स्वागत करण्यात आले.
विनोद बडगुजर आणि अँड सागर शिंपी यांच्या भाजपात प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठा ढळा निर्माण होण्याची शक्यता आहे. उपस्थित नेत्यांनी या नव्या प्रवेशाची स्वागत करताना पुढील काळात पक्षाच्या विकासासाठी त्यांचे सक्रिय योगदान अपेक्षित असल्याचे सांगितले. पक्षात सामील झालेल्या दोन्ही व्यक्तींनीही आपल्या भाषणात भाजपाच्या धोरणांना समर्थन दिले व स्थानिक जनता आणि विकासासाठी काम करण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले.





















