जळगाव मिरर | ९ एप्रिल २०२४
मित्राकडे हळदीच्या कार्यक्रमाला जात असलेल्या तरुणाला चौघांनी रस्त्यात थांबवून त्याच्या हातातील चांदीचे ब्रासलेट, मोबाईल व रोकड जबरीने चोरुन नेल्याची घटना जे. के पार्क परिसरात घडली होती. एमआयडीसी पोलिसांनी चौघ संशयितांच्या मुसक्या आवळीत जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरलेली मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विद्युत कॉलनीतील कुणाल विजय सोनार हा मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी जात होता. मेहरुण तलाव परिसरातील जे. के पार्कजवळ चार अनोळखी इसमांनी त्याला अडवून त्याला मारहाण केली. तसेच त्याच्या हातील चांदीचे ब्रासलेट, मोबाईल व रोकड जबरीने चोरुन नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरुणाने सांगितलेल्या वर्णणानुसार पोलिसांकडून संशयितांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, ही जबरी चोरी तांबापुरा परिसरातील सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगाराने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी पथक तयार करुन संशयितांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पथकाने चौघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. यावेळी ही चोरी त्यांनीच केल्याचे कबुली दिली, तसेच त्यांनी चोरलेला मुद्देमाल देखील हस्तत करण्यात आला आहे. संशयितांना न्या. वसीम देशमुख यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्र्य पोटे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ किरण पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, सचिन पाटील, किशोर पाटील, ललित नारखेडे, साईनाथ मुंडे यांच्या पथकाने केली.