
जळगाव मिरर | २४ जून २०२४
राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्ष व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी जळगाव महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू फेडरेशन पिंप्राळा हुडको येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. महानगर युवक उपाध्यक्ष फैजान राजू पटेल व वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष विक्की राजपूत यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या शिबिरात 177 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात व २० ते २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिरात डॉक्टर राजेंद्र सरोदे, डॉक्टर ज्ञानेश्वर भेरडे, आणि डॉक्टर प्रीती टोके यांनी उपस्थित राहून आरोग्य तपासणी केली. तसेच अनेक लोकांनी या ठिकाणी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक राजू पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जळगाव महानगर अध्यक्ष अभिषेक दादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष कल्पना ताई पाटील, महिला महानगर महिला अध्यक्ष मीनल ताई पाटील, युवक महानगराध्यक्ष सुशील शिंदे, वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष विक्की राजपूत, गौरव लव्हंगले, आकश बाविस्कर, अमजत रंगरेज, हुसेन साबरी, हुसेन शेख, इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.