जळगाव मिरर | २७ एप्रिल २०२४
मानवी बुद्धीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संपत्तीचे रक्षण करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २६ एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिन सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्ताने जळगाव शहरातील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात “जागतिक बौद्धिक संपदा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एकूण १९४ कॉपीराईट व १८ पेटंट महाविद्यालयाच्या विध्यार्थी व प्राध्यापकांनी दाखल केले. गेल्या तीन वर्षापासून असे विक्रम करणारे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळवत असलेल्या जी. एच. रायसोनी महाविद्यालयाने २०२२ ला १५४ – २०२३ ला १०८ अन यावर्षी जागतिक बौद्धिक संपदा दिनाच्या औचित्याने १९४ कॉपीराईट व १८ पेटंट नोंदवून मोठी कामगिरी केली आहे. इस्टीट्युटच्या इंडस्ट्री प्रॅक्टीसेस, अॅकडमिक, शैक्षणिक साहित्य तसेच इंडस्ट्रीमध्ये कुठकुठल्या बेस्ट प्रॅक्टीसेस आहेत यासह स्टुडंट्स प्रोजेक्टवरील पोस्टर, लॅब मॅन्युअल, कोर्स नोट्स, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, मोनोग्राफ आदी बाबींवर हे कॉपीराइट दाखल करण्यात आले आहेत.
हा उपक्रम इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स सेल व रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स सेलचे प्रा. डॉ. विकास गीते व भावनगर येथील सेंट्रल सोल्ट अँड मरीन केमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट येथील प्रिन्सिपल सायंटिस्ट प्रा. डॉ. संजय पाटील हे उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, बौद्धिक संपत्तीचे हक्क हे निर्मात्याला त्याच्या अविष्काराचे, विचारांचं आणि कलात्मक अभिव्यक्तीचे संरक्षण देतात. हे हक्क म्हणजे वैयक्तिक तसेच देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण आयुधे आहेत. ते देशाच्या प्रगतीचे मापदंड ठरतात. म्हणूनच कोणत्याही देशाच्या प्रगतीचा आलेख मोजताना त्या देशाची बौद्धिक संपदेमधील कामगिरी, म्हणजेच त्या देशात होणारी संशोधने, पेटंट हा महत्त्वपूर्ण घटक ठरतो. तसेच एनइपीनुसार विध्यार्थ्यांचे अध्ययन येथे सुरु असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा हा मुख्य उद्देश समोर ठेवून असे उपक्रम येथे दरवर्षी राबविले जातात तसेच भारताच्या जडण-घडणीत रायसोनी इस्टीट्युटचे संशोधित तंत्रज्ञान, डिझाईन व उत्पादनाचे मोठे योगदान असून येथील विध्यार्थी व प्राध्यापक सतत याबाबतीत अग्रेसर असतात असे सांगत त्यांनी भारतीय पेटंटचे महत्त्व, भारतातील पेटंट फाइल्सची वर्तमान स्थिती, पेटंट हक्काचे आर्थिक महत्त्व, भारतीय पेटंट संरक्षणाची जागतिक परिस्थिती, भौगोलिक निर्दर्शन अशा विविध मुद्द्यांवर प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. यानंतर कार्यक्रमातील प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स सेलचे प्रा. डॉ. विकास गीते यांनी म्हटले कि, बौद्धिक संपदा निर्माण करणं आणि ती राखणं, तसंच इतरांच्या बौद्धिक संपदेचं कायद्यानुसार जे मूल्यमापन झालेलं असेल, त्यानुसार तिचा मान राखणं… हाच आजच्या ‘जागतिक बौद्धिक संपदा दिना’चा उद्देश आहे, बौद्धिक संपदेचे सरंक्षण ही अतिशय महत्त्वाची बाब असून, कॉपीराइटचा लाभ व्यक्तीच्या मृत्यूनंतर ६० वर्षांपर्यंत व्यक्तीच्या कुटुंबियांना रॉयल्टी मिळण्याची तरतूद भारतीय कायद्यात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्ञान आणि तंत्रज्ञानातील कल्पक संशोधनांनी सर्व स्तरांवरील मानवी जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणले आहेत. संशोधकाच्या सर्जनशील कल्पकतेचा संशोधनाच्या वापरावरील हक्क आता सर्वमान्य आहे. समाजाच्या हितासाठी त्याचा उपयोग करून घेता यावा, अशा संशोधनाला साधनसामुग्रीची वाण भासू नये, किंबहुना समाजातील संशोधकीय गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे, या दृष्टीने पेटंट कायद्यांच्या स्वरूपात नियंत्रणव्यवस्था जगभर अस्तित्वात आणण्यात आली आहे. भारतही त्याला अपवाद नाही असे मत त्यांनी यावेळी नोंदविले यानंतर भावनगर येथील सेंट्रल सोल्ट अँड मरीन केमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट येथील प्रिन्सिपल सायंटिस्ट प्रा. डॉ. संजय पाटील यांनी डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ एनर्जी ईफ्फीसीएंट डीसलाईनेशन सिस्टीम या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेसाठी अॅकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील व रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलचे डीन प्रा. डॉ. गौरव धाडसे यांनी समन्वय साधले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्योती जाखेटे यांनी केले.
या विषयांवर “पेटंट” दाखल
AI-पॉवर्ड व्हॉइस क्लोनिंग आणि मशीन भाषांतर वापरून व्हिडिओ डब करणे, ब्लॉकचेन आधारित विकेंद्रित स्मार्ट करार शैक्षणिक प्रमाणन प्रणाली, Next.js आधारित वेबसाइट आणि कारागिरासाठी फ्लटर आधारित अर्ज, डीप लर्निंग आणि मशीन लर्निंग आधारित वैद्यकीय निदान प्रणाली आणि पद्धत, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये ओळखल्या जाणार्या संसाधनांच्या कमतरतेच्या सांख्यिकीय आणि परिमाणात्मक विश्लेषणासाठी एक पद्धत उद्योजकता, डिजिटल मार्केटिंगमध्ये ऑगमेंटेड रिअॅलिटीची संकल्पना एम्बेड करण्यासाठी पद्धतशीर फ्रेमवर्क, स्मार्ट शहरांमधील वाहतूक नियंत्रणासाठी IOT आधारित आपत्कालीन हाताळणी संप्रेषण, भारतातील विविध राज्यांमध्ये दळणवळणासाठी इंग्रजी भाषेच्या महत्त्वाचे विश्लेषण, औषध वितरण प्रणालीसाठी संगणक सहाय्यित डिझाइन, बायोमेडिकल ऑटोमेशनसाठी IOT, मोल्डिंग मशीनसाठी IH, माती संरचना परस्पर विश्लेषणासाठी इंटरफेसच्या जाडीवर माती आणि संरचना पॅरामीटर्सचा प्रभाव निश्चित करण्याची पद्धत, भारतातील स्मार्ट शहरांमध्ये स्मार्ट सार्वजनिक ग्रंथालयांचा प्रभाव, IOT आधारित सोलर ट्रॅकिंग सिस्टीम, उष्णकटिबंधीय हवामान परिस्थितीसाठी कार्यक्षम पोल्ट्री हाउस डिझाइन, आयओटी आधारित ओमिक्रॉन एका कोविड-19 चाचणी बूथमध्ये उदयास आले ज्यामध्ये अभ्यागताच्या थर्मल इमेज डिटेक्शनसह सक्षम करणे, सखोल शिक्षणाचा वापर करून ऊर्जा वापराचा अंदाज आणि अलर्ट जनरेशन, स्मार्ट हेल्थ मॉनिटरिंग सिस्टमने एमएल आणि बिग डेटा अॅनालिटिक्स वापरून स्मार्ट ग्रीड सक्षम करणे, मशीन लर्निंग आणि IOT वापरून फोटोव्होल्टेइक ग्रिड्सच्या जास्तीत जास्त पॉवर पॉइंटचा मागोवा घेणे