जळगाव मिरर | ५ मे २०२४
शहरातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरु झाले असून नुकतेच ळ विक्री करुन मुलाला बी फार्मसीला प्रवेशासाठी लागणाऱ्या रकमेसह इतर रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना गुरुवार दि. २ मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे कुटुंबियांना नातेवाईकांकील लग्नाला सहकुटुंब जाणे चांगलेच महागात पडले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सुरेश नगरातील रहिवासी असलेले विलास मुरलीधर चौधरी (वय ४८) यांचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या व्यवसायाची रक्कम तसेच मुलाच्या बी फार्मसीला प्रवेश घेण्यासाठी लागणारी रक्कम असे एकूण ४५ हजार रुपये त्यांनी घरात ठेवलेले होते. दि. १ मे रोजी सुटी आल्याने त्यानंतर ते प्रवेश घेणार होते. मात्र अमळनेर येथे नातेवाईकांकडे लग्न असल्याने ते दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ते कुटुंबियांसह लग्नाला गेले होते. दरम्यान, त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून सोने, चांदीचे दागिने तसेच रोख ४५ हजार रुपये असा एकूण ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
