जळगाव मिरर | १० ऑगस्ट २०२३
येथील भाजपाचे कार्यकर्ते गिरीष नारखेडे यांची भाजपाच्या आयटी सेलच्या उत्तर महाराष्ट्र संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. अशा आशयाचे पत्रही नारखेडे यांना प्राप्त झाले आहे.
या नियुक्तीबद्दल गिरीष नारखेडे यांच्यावर ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खा. रक्षाताई खडसे, खा.उन्मेष पाटील, आ.राजुमामा भोळे, आ.संजय सावकारे, आ.मंगेश चव्हाण, विधानपरिषदेचे आ.चंदूभाई पटेल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, उज्ज्वला बेंडाळे, बेटी बचाओ अभियानचे राजेंद्र फडके यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.