जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२५
प्रेयसीने नकार दिल्याने नैराश्यातून गांधली येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना क्रीडा संकुलाच्या शेजारी डुबकीचा मारोती रस्त्यावर बुधवार दि. ६ रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर येथील गांधली परिसरातील गौरव रवींद्र बोरसे (वय २१) या तरुणाने दि.६ रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास रस्त्यालगत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनस्थळी सहाययक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर पोहेकॉ विनोद भोई, पोहेकॉ मिलिंद बोरसे, विनोद संदानशिव यांनी भेट देऊन पंचनामा केला. गौरवचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात नेले.
दरम्यान गौरवच्या मित्रांनी त्याने गळफास घेण्यापूर्वी इन्स्ट्राग्रामवर टाकलेला व्हिडीओ शोधून काढला असता गौरवने त्याच्या आईला विनवणी केली आहे की आई तू माझ्या जाण्यानंतर रडू नको, मी तुझी इच्छा पूर्ण करू शकलो नाही. माझे वडील माझ्यावर पैसे खर्च करायला नाही म्हणायचे. बाप्याला शिकव, मित्रांना आवाहन करताना त्याने सांगितले की, मित्रांनो प्रेम करू नका. आपापल्या अभ्यासात लक्ष ठेवा, मी एका मुलीवर प्रेम केले. आम्ही अल्पवयीन असताना लग्न केले होते. तिने मला नकार दिला, ती विसरून गेली माझे खरे प्रेम आहे मी जीवन संपवत आहे. मी आई वडिलांना सोडून जायला नको, मी जी चूक करत आहे ती तुम्ही करू नका.. असे आवाहन त्याने मित्रांना केले आहे. चर्चेतून मिळालेली माहिती अशी की, वय पूर्ण झाल्यावर गौरवने त्याच्या प्रेयसीला आता आपण लग्न करू असे सांगितले असता तिने स्पष्ट नकार देऊन मी तुला विसरली असे सांगितल्याने त्यांचे वाद झाले आणि थोड्या वेळानंतर त्याने इन्स्ट्राग्राम वर व्हिडीओ टाकला आणि नंतर झाडाला गळफास घेत त्यांने जीवन संपविल्याची माहिती चर्चेतून समोर आली आहे. भूषण हेमराज सूर्यवंशी याने खबर दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.
