मुंबई : वृत्तसंस्था
सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात स्थिरता दिसून आली. आजही सोने चांदीच्या दरात स्थिरता दिसून येत आहे. सध्या सोने चांदी खरेदी करण्याकडे सर्वांचा कल दिसतोय अशात सोन्याच्या भावातील स्थिरता ग्राहकांसाठी उत्तम संकेत आहे. येत्या दिवसात आता सोने चांदीचे दर आता महागणार असल्याची दाट शक्यता आहे.
आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,550 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,870 रुपये आहे तर10 ग्रॅम चांदीचा दर 574 रुपये आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.
चेन्नई – 48,500 रुपये
दिल्ली – 52,030 रुपये
हैदराबाद – 51,870 रुपये
कोलकत्ता -51,870 रुपये
लखनऊ – 52,030 रुपये
मुंबई – 51,870 रुपये
नागपूर – 51,900 रुपये
पूणे – 51,900 रुपये
देशात येणार ‘वन गोल्ड वन रेट’ योजना
देशात ‘वन गोल्ड वन रेट’ योजना लागू करण्याची मागणीला जोर धरलाय कारण हेच सोने दिल्लीत दुसऱ्या दराने विकले जाते, नंतर पटण्यात दुसऱ्या दराने. तामिळनाडूपासून जम्मू-काश्मीरपर्यंत तुम्हाला सोन्याच्या किमतीत मोठी तफावत दिसेल. सोने तेच आहे आणि सोन्याची शुद्धताही तीच आहे. कारण बंदरातून सोने आयात करुन उतरवले जाते, तेथून वेगवेगळ्या राज्यांत पाठवले जाते. शिपिंग खर्च इत्यादी जोडल्यानंतर सोन्याची किंमत बदलते. मात्र, आयातीच्या वेळी सोन्याची किंमत समान असते. त्यामुळे येत्या काळात देशात ‘वन गोल्ड वन रेट’ येण्याच्या हालचाली सुरू आहे.