जळगाव मिरर / १४ नोव्हेंबर २०२२
तुळशी विवाहानंतर आता विवाह सोहळ्याची धूम धडाक्यात सुरुवात होत असतानाच लग्नाची तयारी करणाऱ्यांना झटका देणारी बातमी सराफा बाजारातून समोर आली आहे.
दिवाळी नंतर सोनं महागल आहे. सोन्याचा दरात तब्बल दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. दिवाळीनंतर सोनं 1500 रुपयांनी वधारले आहे. सोन्याचा भाव 52, 500 रुपये प्रतितोळा इतका झाला आहे. तर चांदीच्या भावातही एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता सराफा बाजारातील तज्ञांनी वर्तवली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम सोन्या चांदीच्या दरावर पहायला पाहिला मिळत आहे. गेल्या पंधरा दिवसात सोन्याचे भाव पंधराशे रुपयांनी वाढले आहेत. तर, पुढील काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात अजूनही वाढ होण्याची शक्यता सोने व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.