
जळगाव मिरर | ३ मार्च २०२६
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदवली गेली आहे. त्यामुळे सराफा बाजारात ग्राहकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, १० तोळा सोन्याच्या दरात तब्बल ४,९०० रुपयांची घट झाल्याने खरेदीसाठी ही चांगली संधी मानली जात आहे.
बाजारातील दरांनुसार, २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ४९० रुपयांची घट झाली आहे. आज १ तोळा (१० ग्रॅम) २४ कॅरेट सोन्यासाठी १,७०,०२० रुपये मोजावे लागत आहेत. सोमवारी हा दर १,७०,५१० रुपये होता. तसेच २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ४,९०० रुपयांची घसरण होऊन आज हा दर १७,००,२०० रुपयांवर आला आहे. सोमवारी हा दर १७,०५,१०० रुपये होता.
२२ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे. १ तोळा २२ कॅरेट सोनं आज १,५५,८५० रुपयांना उपलब्ध आहे. सोमवारी हा दर १,५६,३०० रुपये होता. म्हणजेच ४५० रुपयांची घट झाली आहे. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ४,५०० रुपयांची घसरण होऊन आजचा दर १५,५८,५०० रुपये झाला आहे. सोमवारी तो १५,६३,००० रुपये होता.
२४ आणि २२ कॅरेटप्रमाणेच १८ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे. १ तोळा १८ कॅरेट सोन्याचा दर आज १,२७,५२० रुपये असून सोमवारी तो १,२७,८८० रुपये होता. म्हणजेच ३६० रुपयांची घट झाली आहे. १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्यासाठी आज १२,२७,५२० रुपये मोजावे लागतील. सोमवारी हा दर १२,७८,८०० रुपये होता.
सोन्याच्या दरातील या घसरणीमुळे लग्नसराई आणि सणासुदीच्या खरेदीसाठी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि डॉलरच्या तुलनेत रुपयातील बदल याचा परिणाम स्थानिक बाजारावर होत असतो. दरात झालेली घसरण अल्पकालीन की दीर्घकालीन ठरणार, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी सोनं खरेदीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.





















