
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
खान्देशातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच दिवाळीपूर्वी अमळनेर, नंदुरबारमार्गे भुसावळ-सातारा रेल्वे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. भुसावळ-सुरत मार्गावरील कामांच्या पाहणीसाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे विशेष रेल्वेने जात असताना नंदुरबार येथे काही काळ थांबले असता यावेळी मा.आमदार शिरीषदादा चौधरी व पदाधिकारी त्यांनी अमळनेर– नंदुरबार– पुणे गाडी ची विनंति केली यावेळी रेल मंत्री म्हणाले कि, जळगाव-उथना दरम्यान रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम उत्कृष्ट झाले आहे, आता तिसरी लाइन टाकण्यासंदर्भात विचार करण्यात येईल, शिवाय दिवाळीपूर्वी भुसावळ- सातारा रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन दानवे यांनी दिले.
या स्थानकांवर असणार थांबा
ही गाडी जळगाव, धरणगाव, अमळनेर, शिंदखेडा, नंदुरबार, नवापूर भेस्तानमार्गे वसईरोड, कल्याण, कर्जत, लोणवळा, पुणेमार्गे साताच्याला जाणार आहे.





















