अमळनेर : विक्की उत्तम जाधव
श्री.पंडित प्रदिप मिश्रा यांच्या जळगांव वडनगरी येथील शिवमहापुराण कथेच्या कार्यक्रमासाठी विद्या विहार कॉलनी येथील विद्येश्वर महादेव मंदिर अमळनेर येथून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या भविकाना या कथेसाठी जावयाचे असेल त्यांनी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
याप्रसंगी शिवमहापुराण कथेसाठी भाविकांना रवाना करतांना वाहक व चालक यांना नारळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवि पाटील कपिल पाटील, संजय पाटील, राहुल शिंपी, कल्पेश साळुंखे, किरण अहिरे, दिपक पाटील, महेश पाटील, विवेक तेले, शिवनारायण पाटील, मेघराज पाटील, विकास माळी, प्रविण गुजर, भरत पाटील यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.11 तारखेपर्यंत रोज बस विद्या विहार कॉलनीच्या गेट पासून निघतील ज्यांना कथेसाठी जळगांव जायचे असेल त्यांनी आयोजकाशी संपर्क साधावा असे आवाहन माजी नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील,सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील यांनी केले आहे.