जळगाव मिरर | १४ ऑक्टोबर २०२३ |
दसरा, दिवाळी आणि छटपूजेनिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालविण्याचा तसेच आठ गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्र. ०२१३९ सुपरफास्ट स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. १९ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत सोमवारी आणि गुरुवारी रात्री १२.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल.
गाडी क्र. ०२१४० सुपरफास्ट स्पेशल दि. २१ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत मंगळवारी आणि शनिवारी दुपारी १.३० वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ४.१०वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या गाड्यांसाठी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या ठिकाणी थांबे असतील. तसेच यात १६ तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी क्लास आणि दोन जनरेटर व्हॅन असतील.
नागपूर-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (१० फेऱ्या) गाडी क्र. ०२१४४ सुपरफास्ट स्पेशल दि. १९ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक गुरुवारी सायंकाळी ७.४० वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पुणे येथे पोहोचेल. तर गाडी क्र. ०२१४३ सुपरफास्ट स्पेशल दि. २० ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबरपर्यंत दर शुक्रवारी पुणे येथून दुपारी ४.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ६.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाइन आणि उरुळी येथे थांबे असतील. तसेच या गाडीला १६ तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी क्लास आणि दोन जनरेटर व्हन