जळगाव मिरर | ७ ऑक्टोबर २०२४
राज्यासह जळगाव शहरात सध्या नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू असताना जळगाव शहरातील प्रत्येक परिसरात असलेल्या मंदिरांसाठी शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्यातर्फे मागेल त्या मंदिराला शिवलिंग देणार असल्याची माहिती दिली आहे.
जळगाव शहरातील प्रत्येक प्रभागासह परिसरातील अनेक भागात धार्मिक मंदिर असून या ठिकाणी अनेक सामाजिक संस्था उपक्रम देखील राबवत असतात त्याच माध्यमातून जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी स्तुत्य उपक्रम जळगाव शहरात राबविण्यात येणार असून ज्या परिसरातील धार्मिक मंदिराला शिवलिंग हवे असल्यास त्यांनी माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांच्याशी संपर्क साधावा त्या मंदिर झाला शिवलिंग भेट देणार असल्याची माहिती डॉ. अश्विन शांताराम सोनवणे यांनी बोलताना दिली आहे.