जळगाव मिरर | १२ एप्रिल २०२४
राज्यात उन्हाचा कडाका वाढत असून अनेकांना सुट्या देखील लागल्या असल्याने अनेक लोक बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने उन्हाळी अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
क्र. ०९०३७ उधना-भागलपूर स्पेशल उधना येथून १३ आणि १६ एप्रिल रोजी ११:२५ वाजता सुटेल आणि भागलपूरला दुसऱ्या दिवशी २०:०० वाजता पोहोचेल. तर, क्र. ०९०३८ भागलपूर-नंदुरबार स्पेशल गाडी १४ आणि १७ एप्रिल रोजी भागलपूर येथून २३:०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी नंदुरबारला ०७:३० वाजता पोहोचेल. या गाडीला नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, पटना, बख्तियारपूर, मोकामा, किउल, जमालपूर आणि सुलतानगंज स्थानकावर थांबा असेल.
तसेच, क्र. ०९०३९ उधना जयनगर स्पेशल ही गाडी उधना येथून रविवार १४ एप्रिल रोजी ११:२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३:०० वाजता जयनगरला पोहोचेल. क्र. ०९०४० जयनगर-नंदुरबार विशेष गाडी मंगळवार १६ रोजी जयनगर येथून ०२:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२:०० वाजता नंदुरबारला पोहोचेल. या गाडीला नंदुरबार, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, आदी स्थानकांवर थांबा असेल.