जळगाव मिरर | १५ ऑगस्ट २०२४
राज्यात आज स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा देत लाडकी बहिण योजनेबद्दल सांगितले. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, बहिणींसाठी भावाचे कर्तव्य म्हणून आम्ही ही योजना आणली. ७ तारखेपासून बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. सरकारने शब्द पाळला आहे. १७ ऑगस्ट पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. ही रक्षाबंधनाची ओवाळणी द्यायला आम्हीला संधी मिळाली, त्यासाठी आम्ही भाग्यशाली समजतो.
यावेळी फडणवीस म्हणाले, आमचा भारत देश असाच विकसित होत राहो आमचा तिरंगा झेंडा सातत्याने फडकत राहो, लोकशाही प्रगल्भ होत राहो, अशी शुभेच्छा देतो.
लाडकी बहिण योजनेबद्दल बोलताना ते म्हणाले- मला आनंद आहे की, लाडकी बहिण योजना जी आम्ही घोषित केली होती, त्याचा निधी कालपासून वितरीत करायला सुरुवात केली आहे. १७ तारखेपर्यंत १ कोटीपेक्षा जास्त लाडक्या भगिनींच्या खात्यात पैसे जमा होतील. नंतर जे फॉर्म भरत आहेत, त्यांची प्रोसेस झाल्यानंतर त्यांच्याही खात्यामध्ये आम्ही निधी जम करू. पण मला अतिशय आनंद आहे की, रक्षाबंधनाची ओवाळणी द्यायला मिळत आहे.