जळगाव मिरर । २१ नोव्हेंबर २०२५
जळगाव शहरात येत्या रविवारी 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री बालाजी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे आयोजित या शिबिराचा उद्देश विविध आजारांबाबत सर्वसामान्य नागरिकांना मोफत तपासणी आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. या शिबिराचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते भगवान सोनवणे व रेखाताई सोनवणे यांनी केले आहे.
या शिबिरामध्ये स्त्रीरोग, हृदयरोग, थायरॉइड, बी.पी., शुगर, शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, त्वचारोग, हाड विकार, मुळव्याध आदी विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे, रुग्णांना आवश्यक असणारी औषधे मोफत देण्यात येतील. तसेच ECG, B.P., शुगर चेक, तसेच सोनोग्राफी आणि एक्स-रे सुविधा अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळवले आहे. शिबिरामध्ये विविध क्षेत्रांतील अनुभवी डॉक्टर उपस्थित राहणार असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिराचे ठिकाण – प्लॉट नं. 303, नवीन बस स्टँड जवळ, हॉटेल रॉयल पॅलेसच्या मागे, गांधी नगर, जळगाव असे असून अधिक माहितीसाठी नागरिकांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.
स्थानिक नागरिकांसाठी आरोग्य सेवांचे हे उत्कृष्ट व्यासपीठ ठरणार असून, मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.




















