जामनेर : करण साळुंके
शहरातील पाचोरा रोड रिक्षास्टाॅप जवळील सिद्धिविनायक गणपती मंदिर यांच्यावतीने १५ वर्षापासून महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो यंदाही हा कार्यक्रम मोठ्या उस्ताहात होत आहे. यावेळी जामनेर येथील गणेश भक्ताचे अनमोल सहकार्य लाभते.
याठिकाणी सिद्धिविनायक गणेश मंडळांचे आयोजक जवाहर शेठ, अनिल बोहरा, अध्यक्ष संतोष रामदास झाल्टे, उपाध्यक्ष बाळू प्रल्हाद माळी, खजिनदार संजय रामदास झाल्टे, युवराज झाल्टे गोविंदा पांडुरंग कापडे, विलास चवरे, गजानन चौधरी, समाधान माळी, सोपान माळी, रवी माळी,शंकर माळी,शेनफडू माळी, ईश्वर माळी, नारायण शिंदे,विलास भोई, ईश्वर कापसे,विरू राजपूत, ईश्वर भोई,मोती राणा,आदी गणेश भक्तांची उपस्थिती असून वाकी येथील गेल्या पंधरा वर्षांपासून रिक्षा चालक असणारे लोकनियुक्त सरपंच सुधाकर गंगाराम सुरवाडे यांच्या हस्ते प्रत्येक वर्षी अनमोल असे उत्कृष्ट सहकार्य त्यांच्या हातून घडून येत आहे. यावेळी पुढील जीवनात माझ्या हातून असेच शुभ कार्य घडून येवो हिच मागणी गणपती बाप्पा जवळ नतमस्तक होऊन सरपंचानी आपली मनोकामना केली आहे.