
जळगाव मिरर | २१ मे २०२५
यावल तालुक्यातील आडगाव येथून १६ वर्षीय नातुला घेवुन ७० वर्षीय वृद्ध आजोबा चिंचोली येथे इयत्ता दहावीचे मार्कशीट घेण्यासाठी दुचाकीवर जात होते. दरम्यान त्यांच्या दुचाकीला चिंचोली गावाजवळील आडगाव फाट्याजवळ पिकअप वाहनाने धडक दिली. या अपघातामध्ये आजोबा सुभाष बाबुराव पाटील (वय ७०) जागीच ठार झाले तर नातू कल्पेश उत्तम पाटील (वय १६) हा गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात दि.२० मे मंगळवारी दुपारी एक ते दिड वाजेच्या दरम्यान घडला. तर या अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, आडगाव येथील सुभाष पाटील हे दुचाकी क्र. एम. एच. ०४ बी. एक्स. ४५६८ द्वारे नातू कल्पेश याला घेऊन चिंचोली येथील विद्यालयात इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आणि मार्कशीट घेण्यासाठी जात होते. दरम्यान चिंचोली गावा जवळील आडगाव फाट्यापासून काही अंतरावर त्यांच्या दुजाकीला पीकअप वाहन क्रमांक एम. एच. ०४ के.एफ. ८४४० वरील अज्ञात चालकाने धडक दिली. या अपघातामध्ये सुभाष पाटील हे जागीच ठार झाले. तर कल्पेश पाटील याला गंभीर दुखापत झाली. पीकअप वाहन वरील अज्ञात चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















