जळगाव मिरर | ९ जुलै २०२५
शेअर मार्केटमधील कर्जावरून झालेल्या वादातून नातवाने आजीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना धरणगाव येथे घडली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या लिलाबाई रघूनाथ विसपुते (वय ७०, रा. महाबळ) या महिलेवर पुणे येथे उपचार सुरु असतांना त्यांचा दि. ८ रोजी दुपारी मृत्यू झाला. त्यामुळे याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यांनी दिली.
सविस्तर वृत्त असे कि, शेअर मार्के टमध्ये गुंतवणुकीसाठी मोठ्या मुलीकडे गेलेल्या लीलाबाई प्रमाणावर कर्ज केल्यामुळे विसपुते यांनी नातवाला रागविले होते. यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद झाल्याच्या घटना घडल्या होत्या. दि. २६ जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास तेजस आणि लिलाबाई यांच्यात शेअर मार्केटच्या कर्जावरून पुन्हा मोठा वाद झाला होता. याच वादातून बेडरुममध्ये झोपलेल्या लिलाबाई यांच्यावर तेजस विलास पोतदार (रा. धरणगाव) याने वार करुन गंभीर जखमी केले होते. वार केल्यानंतर तेजसने आजीवर आजीवर कुणीतरी हल्ला केल्याचा त्याने बनाव केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा उलगडा करीत हा गुन्हा संशयित तेजसने केल्याचे उघड केले होते. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
