जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२४
चोपडा शहरातील नायरा पंपाजवळील मोहम्मद कादिश शेख आयुब याच्या दुकानातून १ लाख ८७ हजाराचा पान मसाला, सुगंधित तंबाखू, पान मसाला, गुटख्याचा साठा चोपडा शहर पोलिसांनी २४ रोजी मध्यरात्री जप्त केला आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शहरातील केजीएन कॉलनी येथील रहिवासी असलेला मोहम्मद कादिश शेख आयुब (वय ३८) याच्या नायरा पेट्रोल पंपामागील गल्लीतील दुकानात सुगंधित तंबाखू, पानमसाल्याचा साठा जमा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी त्याच्या दुकानावर २४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकली.
त्यावेळी तेथे १ लाख ८७ हजार ३८० रुपयांचा सुगंधित पान मसाला, गुटखा आढळून आला आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसांनी मोहम्मद काझी शेख आयुब याच्यावर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे, जितेंद्र सोनवणे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर बच्छाव, संदीप भोई, विनोद पाटील, प्रकाश मथुरे, प्रमोद पवार, मदन पावरा यांनी केली.
