जळगाव मिरर | १० सप्टेंबर २०२६
समाजात दहशत निर्माण करणाऱ्यांसह वारंवार गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या अजय तानाजी सोनवणे (भिल) (वय २८, रा. पुनगाव, ता. पाचोरा) व राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी (वय ३२, रा. पाचोरा) या दोघांना जळगाव, बुलढाणा, धुळे व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.

पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजय सोनवणे याच्याविरुद्ध दोन तर राकेश उर्फ सचिन चौधरी याच्याविरुद्ध खूनासह दोन गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्यावरील हद्दपारीच्या कारवाईचा प्रस्ताव पोलीस निरीक्षकांनी पाठविला होता. त्या प्रस्तावाला मंजूर देत दोघांना जळगाव, बुलढाणा, धुळे व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातन दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.





















