
जळगाव मिरर | २२ ऑगस्ट २०२३

जळगाव शहरात गेल्या अनेक दिवसापासून दुचाकी, चारचाकीच्या अपघाताची मालिका सुरुच असून आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास शहरातील आकाशवाणी चौकात ट्रकने दिलेल्या धडकेत एका ५२ वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आज बैठकीचे आयोजन केले असता. या बैठकीस कोल्हाडी विकासोचे सचिव पंजाबराव बोरसे(वय ५२) हे सकाळी बोदवड येथून दुचाकीने (एम.एच.19 ए.सी.224) ने जळगावला यायला निघाले. ते शहरातील आकाशवाणी चौकात आल्यानंतर मागून गॅस सिलिंडर घेऊन जाणार्या ट्रकने (एम.एच.04 जे.यु.9596) त्यांना धडक दिली. यात बोरसे चाकाखाली आले व त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर नागरीकांनी तेथे धाव घेतली व पोलिसही तेथे पोहचले. त्यांनी रुग्णवाहिका मागवून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला.





















