
जळगाव मिरर । १५ सप्टेंबर २०२३
जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरातील न्यू एरा एज्युकेशन सोसायटी संचलित रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम हायस्कूल .शाळेत नुकताच हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
न्यू एरा एज्युकेशन सोसायटी संचलित रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम हायस्कूल शाळेत दि १४ रोजी हिंदी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका सौ.सीता गोपाल तिवारी, उपमुख्याध्यापिका सौ.प्रीतम सिन्हा यांनी तत्कालीन प्रांतवाद व भाषावाद यावरील विचार कथन केले. केले.इयत्ता तिसरी ते नववी पर्यंत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हिन्दी दिवसावर कविता, गोष्टी, भाषणे, देशभक्तीपर गीते सादर केली. शिक्षक वर्गाने सहकार्य केले . शबनम खान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सौ. प्रियांका कोळी.यांनी केले. व हिंदी शिक्षिका सौ.निशा पाटील यांनी आभाप्रदर्शन केले .





















