
जळगाव मिरर | ११ एप्रिल २०२५
भरधाव डंपरने समोरुन दिलेल्या धडकेत मायलेक गंभीर जखमी झाले. ही घटना भादली ते असोदा रस्त्यावर दि. ७ रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चोपडा येथील शिव कॉलनीतील रहिवासी सुर्यप्रकाश बापूराव बाविस्कर (वय ४९) हे दि. ७ रोजी (एमएच ४६, एन ६३४३) क्रमांकाच्या वाहनाने आईसोबत कडगाव मार्गे भादली ते असोदा रोडने असोदा गावाकडे येत होते. यावेळी असोदा गावाकडून भादली गावाकडे भरधाव वेगाने जात असलेला (एमएच १९, सीवाय ५५६९) क्रमांकाच्या डंपरने त्यांना समोरुन जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील सुर्यप्रकाश बाविस्कर व त्यांची आई रुख्मिणी बाविस्कर हे दोघ गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या वाहनाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धडक दिल्यानंतर डंपर चालक वाहन सोडून तेथून पळून गेला होता. याप्रकरणी सुर्यप्रकाश बाविस्कर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन डंपर चालकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ दिनेश चव्हाण करीत आहे.




















