जळगाव: प्रतिनिधी
२८ ऑगस्ट रोजी रिद्धी जानवी फाउंडेशन व आर जे न्यूज चैनलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या डायनामिक पद्धतीने मशीन द्वारे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले गेले. या कार्यक्रमाला उपस्थित महापौर सौ जयश्रीताई महाजन यांनी आपल्या भाषणात त्यांच्या या नवीन उपक्रमाचे कौतुक केले व प्रत्येकाने याचा आदर्श घ्यावा असे उपस्थितांना आवाहनही केले.आमदार राजू मामा भोळे यांनी त्यांच्या या कार्याला समाजात एक नवी संकल्पना म्हणून प्रत्येकाने याचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ.जयेश वाल्हे हे होते.त्यांनी या मोफत नेत्र तपासणीत सुमारे 200 रुग्णाची तपासणी केली.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही रिद्धी जानवी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.चित्रलेखा मालपणी यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला गेला.प्रत्येक वर्षाला चित्रलेखा मालपाणी या अनोळख्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा करत असतात.त्यात वाढदिवसाच्या निमित्ताने गोरगरिबांमध्ये घरपोच जाऊन कपडे व मिठाईवाटप केली जाते. तसेच गरजवंतांसाठी शिबिरांचे आयोजन केले जाते.
समाजातील सध्याची परिस्थिती पाहून रिद्धी जानवी फाउंडेशन तर्फे निराधारांना मदत करण्यासाठी लवकरच आपल्या सेवेत वृद्धाश्रम तयार होणार आहेत गरीब व गरजवंतांना मदत गरजवंतांना मदत करणे हा त्यांचा मानस आहे.त्यांचा समाजापुढे नवीन आदर्श म्हणजे प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला एक झाड तरी लावावें ही संकल्पना त्यांनीच अमलात आणली आहे. वाढदिवसाला नाहक खर्च वाया न घालवता तो गरीब व गरजवंतांना मदत करून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून जो आनंद मिळतो त्यासारखा अनमोल क्षण जीवनात कोणताच नाही, असे त्यांचे म्हणणे आहे प्रत्येकाने हाच विचार केला तर समाजात खूप वेगळंच वातावरण बघायला मिळेल.
तपासणी शिबिर संध्याकाळी 5 वा पर्यंत सुरू होते शिबिराला माजी नगरसेवक मुकुंदा भाऊ सोनवणे व सामाजिक कार्यकर्ता संजय जी व्यास,संजय अंभोरे,डॉ.विकास निकम,चंदन पाटील,मयूर बारी,ज्योती पुरोहित, हर्षा सोनवणे,कीर्तीमाला राणा,पद्मावती राणा,सतीश दायमा, शुभम दायमा,केजल पाटील,कुमारी जानवी मालपाणी,कुमारी रिद्धी मालपाणी व शनिपेठ मित्र मंडळ ई. कार्यक्रमाला उपस्थित होते.