जळगाव मिरर | ११ जुलै २०२५
अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथे मासेमारी करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना ९ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे कि, पाडळसरे येथील सोपान महारू कोळी (वय ३२) हा तरुण मासेमारी व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होता. ९ रोजी कोळी यांची पत्नी कामावर गेल्यानंतर घराच्या वरच्या मजल्यावर सोपान कोळी हे एकटेच होते. त्यांना कामावर बोलावल्याने त्याच्या भावाने त्यांच्या आईला निरोप दिला.
त्यामुळे आई दुपारी दीड वाजता सोपन कोळी यांन बोलवायला वरच्या मजल्यावर गेली असता सोपान कोळ यांनी झोक्याच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, सोपानच भाऊ, वडील व इतरांन त्याला खासगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
