जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२४
गेल्या काही दिवसांपुर्वीच एरंडोल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात मा.अमोलदादा पाटील यांनी ५६३३२ इतक्या मोठ्या फरकाने विजय संपादन केला. त्यानिमित्त शहरातील सुर्यवंशी बारी समाज पंच मंडळ व पवनपुत्र मित्र मंडळाचा वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम श्री हनुमंत व सुर्यवंशी बारी समाजाचे आराध्यदैवत श्री संत रूपला महाराज यांनी वंदन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. तद्नंतर सुर्यवंशी बारी समाज पंच मंडळ व पवनपुत्र मित्र मंडळाचा वतीने भव्य सत्कार समारंभ पार पडला. या सोहळ्यात देवगांव सरपंच समीरदादा पाटील, पारोळा नगरपरिषदेचे मा.नगराध्यक्ष दयारामआण्णा पाटील यांनी मार्गदर्शन केले तर मुख्य मार्गदर्शन करतांना या समाजाने आजवर मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्यासोबत ४० वर्ष भक्कमपणे साथ दिली, तशीच साथ मला या निवडणुकीत आपण दिली. हा या कार्यकाळातील पहिलाच सत्कार माझा आपल्या समाजाचा माध्यमाने करण्यात आला. बारी समाजाचे आभार मानावे तेवढे थोडेचं आहे, परंतु या आपण दिलेल्या प्रेमाची परतफेड मी आगामी काळातील विकासकामांचा माध्यमातून करणार असल्याचे मा.अमोलदादा पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुर्यवंशी बारी समाज पंच मंडळाचे सचिव परेश सौपुरे सर यांनी केले व सौपुरे सरांनी वास्तुशास्त्राची वास्तु विशारद ही पदवी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार मा.अमोलदादा पाटील यांनी करत त्यांचे अभिनंदन केले. प्रसंगी शहरप्रमुख अमृतभाऊ चौधरी, मा.नगरसेवक मनोजभाऊ जगदाळे, सुरेशभाऊ बारी, सोमनाथभाऊ बारी, योगेश पाटील, मोतीलाल बारी, सुनिल बारी महेंद्र बारी यांचेसह सुर्यवंशी बारी समाज पंच मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, पवनपुत्र मित्र मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, समस्त सुर्यवंशी बारी समाज बांधव, माता-भगिणी व आदी मान्यवर उपस्थित होते.