जळगाव मिरर | २२ डिसेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून लाचखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरु असतांना आता यात चक्क ५० वर्षीय शेतकऱ्याकडून लाच घेताना एका वरीष्ठ तंत्रज्ञ अधिकारीला एसीबीने ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती सरकारी कार्यालयात पसरल्याने मोठी खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील देवगाव या गावातील शिवारात गट नंबर 330 मध्ये ५० वर्षीय तक्रारदार याचे शेत असून या शेतात थ्री फेजचे ट्युबवेल मोटारसाठी यातील तक्रारदार यांनी वीज कनेक्शन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. तक्रारदार वरीष्ठ तंत्रज्ञ अनिल शंकर राठोड (वय २८) यांना भेटल्यानंतर २२ रोजी त्यांनी चार हजारांची लाच मागितली व तीन हजारात तडजोड करण्यात आली. शुक्रवारी दुपारी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. अडावद पोलिसात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे तसेच एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, राकेश दुसाणे, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने यशस्वी केला.