मेष:-शांत राहून कामे करावीत. घरात बौद्धिक चर्चा होईल. नोकरीत बढतीचे योग आहेत. कार्यालयीन वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस.
वृषभ:-घरासाठी खर्च करण्याची तयारी ठेवा. बोलण्यातून इतरांची मने सांभाळून घ्याल. मानसिक शांतता लाभेल. कामात गतीमानता येईल. घरगुती प्रश्न मार्गी लावाल.
मिथुन:-उत्तम गुंतवणूक कराल. जवळच्या व्यक्तीचा सल्ला घ्याल. मित्रांशी मतभेदाची शक्यता. कामे वेळेत पूर्ण होतील. चमचमीत पदार्थांचा आस्वाद घ्याल.
कर्क:-अचानक धनलाभाची शक्यता. मानसिक संतुलन सांभाळा. मुलांकडून चांगले सहकार्य मिळेल. नवीन माहिती शोधण्यात वेळ घालवाल. नकारात्मक विचार दूर ठेवा.
सिंह:-ठरवलेल्या गोष्टी पुढे ढकलू नका. जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ होईल. घरात मंगल कार्याच्या योजना आखल्या जातील. मनोबल वृद्धिंगत होईल. मानसिक शांतता व प्रसन्नता वाढेल.
कन्या:-मनातील इच्छेवर ठाम राहाल. घरात शांतता नांदेल. कामातून मनाजोगे समाधान मिळेल. मुलांना नवीन गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करा. प्रकृतीची हेळसांड करू नका.
तूळ:-दिवस मजेत जाईल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे फार लक्ष देऊ नका. घरगुती गोष्टीत तडजोड करावी लागेल. कामाच्या ठिकाणी शब्दाला मान मिळेल.
वृश्चिक:-शांत राहून कामाची पावती मिळवा. घरगुती खर्चाचा पुनर्विचार करा. व्यायामाची आवड लावून घ्या. मुलांवरील खर्च वाढू शकतो. हातातील कामात यश येईल.
धनू:-धार्मिक ग्रंथांचे वाचन वाढेल. चटकन नाराजी दर्शवू नका. गुंतवणुकीला चांगला वाव आहे. प्रवासाचे योग संभवतात. वरिष्ठांची मर्जी राखावी.
मकर:-आवडी बाबत अधिक दक्ष राहाल. आरोग्याविषयी हलगर्जीपणा करू नका. खाद्य पदार्थांची रेलचेल राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखादे परिवर्तन चांगले असेल.
कुंभ:-दिवस आनंदात घालवाल. जोमाने कामे करत राहाल. भागिदारीतून चांगले उत्पन्न मिळेल. योजलेल्या गोष्टी सुरळीत पार पडतील. क्षुल्लक गोष्टीवरून वाद घालू नका.
मीन:-मन शांत ठेवून निर्णय घ्या. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. फार विचार करत बसू नका. चटकन आपले मत मांडू नका. बचतीच्या योजना आमलात आणा.