जळगाव मिरर | ३१ मे २०२३
धरणगाव तालुक्यातील एका गावामध्ये महसूल पथकातील अधिकारी यांनी वाळूचे ट्रॅक्टर दिसले असताना त्याला पकडण्यासाठी जात होते. यावेळी भरधाव वाळूच्या ट्रॅक्टरने पथकाला हुलकावणी देत ट्रॅक्टर पळवून नेल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील नांदेड फाटा या ठिकाणी मंडळ अधिकारी प्रवीण मधुकर बेंडाळे वय 55 हे दिनांक 29 मे रोजी संध्याकाळी च्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या वाळू ट्रॅक्टर्स थांबविले असता ट्रॅक्टरवरील चालकाने मंडळ अधिकारी यांना हुलकावणी देत एक ब्रास वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेले आहे या प्रकरणी मंडळ अधिकारी प्रवीण बेंडाळे यांनी धरणगाव पोलिसात संशयित आरोपी भटू सैंदाणे राहणार नांदेड यांच्या विरोधात तक्रार दिली असून याप्रकरणी पुढील तपास पोना.चंदुलाल सोनवणे हे करीत आहे