अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर तालुक्यातील काही पिकविमा धारक शेतकऱ्यांचा मोबाईल वर पीकविम्याच्या त्रुटीच्या संदर्भात मेसेज आले आहेत, यामध्ये सामाईक क्षेत्र, करारनामा, बैंक पासबुक, आधारकार्ड, चुकीचा खाते क्रमांक अश्या प्रकारच्या त्रुट्याचा मेसेज आले आहेत.
दरम्यान समाईक क्षेत्र त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांनी १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर विहीत नमुन्यात असलेल्या फॉरमेटवर संपूर्ण अचूक माहिती भरुन आपण ज्या सुविधा केंद्रावरून पिक विमा काढलेला आहे त्या सुविधा केंद्रावरून स्टॅम्प पेपर व पिकविमा पोर्टलवर अपलोड करावा. तसेच ज्या शेतकरी बांधवांनी करारावर शेती घेतली असेल अश्या शेतकऱ्यांनी तालुका पातळीवर दुय्यम निबंधक यांच्या कडे करारनामा करून पिकविमा पोर्टलवर अपलोड करावा.
ज्या शेतकरी बांधवांच्या बँकेच्या पासबुक व आधार कार्डच्या त्रुटी असतील तर त्या लवकरात लवकर दुरुस्त्या करून पोर्टलवरून अपलोड कराव्या, तसेच ज्यांचे बँक खाते क्रमांक चुकीचे आहेत अश्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर ४५ दिवसाच्या आधार कार्ड बेस प्रणालीवर जमा होतील, तरी पिकविमा धारक शेतकऱ्यांनी आपल्या त्रुटीची पूर्तता लवकरात लवकर करावी. अधिक माहितीसाठी नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.