
जळगाव मिरर / ६ डिसेंबर २०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे.येथील एका वृध्द महिलेच्या हातातून सोन्याचे दागिने हिसकावून पळून गेल्याने त्याविरोधात पिंपळगाव हरे.पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील यमुना नगरातील 75 वर्षीय यमुनाबाई नारायण महाजन हे दि.20 रोजी आपल्या घरी असतांना त्या नेहमीप्रमाणे अंघोळीला जाण्यापूर्वी गळ्यातील पोत व करमफुल काढून ठेवले होते, अंघोळ करून बाहेर आल्यावर संशयित आरोपी नाझीम बागवान (रा.पिंपळगाव हरे) हा महिलेच्या घरी येत म्हणाला की, फळबागाचे विम्याचे पैसे आले आहेत, तेव्हा फिर्यादी महिलेच्या हातात सोन्याचे दागिने असलेले 12 ग्रॅम वजनाची 63 हजार रुपयांची पोत व 13 ग्रॅम वजनाचे 13 हजार रुपये किंमतीचे करम फुल पाहून संशयित आरोपीने ते हिसकावून तेथून पळून गेला याप्रकरणी वृध्द महिलेसह नातवांनी पिंपळगाव(हरे.)पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास सपोनि.महेंद्र वाघमारे हे करीत आहेत.




















