जळगाव मिरर | २ ऑक्टोबर २०२३
जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात जेवणासाठी पैसे न दिल्याच्या रागातून आमिरखान रहीमखान (२७) या तरुणाच्या पोटात थेट चॉपर भोसकून जखमी केले. ही घटना शुक्रवार, २८ सप्टेंबर रोजी रात्री शनी मंदिर परिसरात घडली.
याप्रकरणी सचिन जगन्नाथ शिंपी (२२) व सिद्धार्थ अरुण सूर्यवंशी (३०) या दोन जणांविरुद्ध ३० सप्टेंबर रोजी रात्री शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आमिरखान रहीमखान याच्याकडे रिक्षा चालक सचिन शिंपी याने जेवणासाठी पैसे मागितले होते. त्यावेळी त्याला पैसे दिले नव्हते. याचा राग सचिन शिंपीच्या मनात होता. शुक्रवार, २८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आमिर खान याला सचिन शिंपी व सिद्धार्थ सूर्यवंशी हे भेटले.
आमिर खानने सचिनकडे दुर्लक्ष करीत बोलणे टाळले. हा राग सहन न झाल्याने सचिनने हातातील चॉपर त्याच्या पोटात भोसकून जखमी केले. शुद्धीवर आल्यानंतर त्याने शनिवार, ३० सप्टेंबर रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फिर्याद दिली.