जळगाव मिरर | ९ ऑक्टोबर २०२४
रस्ताने जात असलेल्या ज्ञानेश्वर रमेश हटकर (वय १७, रा. तांबापुरा, गवळीवाडा) याला अडवून येथून का जात आहे असे विचारत मारहाण करीत धारदार शस्त्राने वार केला. ही घटना सोमवार दि. ६ ऑक्टोबर रोजी आदित्य चौकात घडली. या प्रकरणी ७ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापूरा परिसरातील गवळी वाड्यात राहणारा ज्ञानेश्वर हटकर हा तरुण शिक्षण घेत आहे. तो रस्त्याने जात असताना त्याला एका जणाने अडविले व तू येथून का जात आहे, असे विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर धारदार शस्त्राने वार केला व दुसऱ्याने डोक्यात रॉड मारून दुखापत केली. तसेच अन्य दोन जणांनीही मारहाण केली. या प्रकरणी ज्ञानेश्वर हटकर याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक पंकज पाटील करीत आहेत.