जळगाव मिरर | ५ मे २०२४
जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांची गौतम नगर परिसरात प्रचार रॅली काढण्यात आली.
रॅलीची सुरुवात श्री.ईच्छादेवी जागृत देवस्थान मंदिरात दर्शन घेवून करण्यात आली. पंतप्रधान मोदींनी केलेल्या विकासकामांमुळे आपला देश बलवान होत असल्याच्या भावना गौतम नगर परिसरातील नागरिकांनी व्यक्त करून “पुन्हा एकदा मोदी सरकार” असा नारा देवून प्रचार रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी गौतम नगर परिसर भाजपामय झाल्याचे चित्र दिसत होते.
प्रचार रॅलीत शहराचे आमदार राजूमामा भोळे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे विनोद देशमुख, रिपाई चे अनिल अडकमोल,शिवसेनेचे नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे,प्रवीण कोल्हे, ,भाजपा नगरसेवक भगत बालाजी अरविंद देशमुख सुनील खडके, जितु मराठे,राजेंद्र घुगे पाटील, दिपक सुर्यवंशी,शोभा चौधरी,सुशील हसवानी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.