जळगाव मिरर | २७ जुलै २०२३
जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी आणि तांबापूर परिसरात गांजाचे सेवन करून नशा करणाऱ्या दोघांवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली.
मिळालेल्या माहिती नुसार, सुप्रीम कॉलनी आणि तांबापूर या परिसरात काही तरुण गांजाचे सेवन करून नशा करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी कारवाई केली. तांबापुरा परिसरात शेख मशरूख अब्दुल खाटील (४२ रा. गवळी वाडा, तांबापुरा) आणि सुप्रीम कॉलनी परिसरात भरत राठोड (२५, रा. सेवालाल चौक, सुप्रीम कॉलनी) या दोघांवर कारवाई केली. पोलिस कॉन्स्टेबल विशाल कोळी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी आणि पोलिस नाईक सुधीर साळवे करीत आहे.