जळगाव : प्रतिनिधी
शहरात बाप्पांना दि ९ रोजी मोठ्या उस्ताहात भावपूर्ण निरोप देण्यात आला यावेळी मेहरूण तलावावरील गणेश घाट परिसरात महिलांनी निर्माल्य संकलन करून त्याची विल्हेवाट लावत पर्यावरणाला कुठलीही हानी होणार नाही याची काळजी घेतली. यामुळे परिसरातील गणेश भक्तांनी या महिला मंडळाचे कौतुक केले.
अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जन यानिमित्ताने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून पर्यावरण वाचविण्याच्या दृष्टीने पर्यावरणपूरक निर्माल्य संकलन हा उपक्रम मेहरुण तलाव गणेशघाट जळगाव येथे नारीशक्ती ग्रूपतर्फे राबविण्यात आला. निर्माल्य पाण्यात विसर्जन करून कोणत्याही प्रकारची जलहानी होऊ नये तसेच परिसरात प्रदूषण होणारे रोखण्याच्या दृष्टीने सर्व निर्माल्य एकाच ठिकाणी संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महिला पर्यावरण सखी मंच पर्यावरणप्रेमीं व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव ग्रूपच्या महिलांनी निर्माल्य संकलन व सोबत श्री गणेश मुर्ती संकलन सकाळी ८ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत केले. या कालावधीत २ ट्रॅक्टर निर्माल्य संकलन करण्यात आले. नारीशक्तीने श्रमदान करून श्री गणेश विसर्जनासाठी अनमोल सहकार्य केले.
यांचा होता सहभाग
नारीशक्ती ग्रुपच्या अध्यक्ष मनिषा पाटील, नूतन तासखेडेकर, रेणुका हिंगु, नेहा जगताप , माधुरी शिंपी, संगीता चौधरी, योगिता बाविस्कर, मयंक जगताप उपस्थित होते.या पर्यावरण रक्षण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.